Saturday, November 21, 2009



चित्रपट पाहिल्यावर ज्याच्या मुखातून "वाह!" येत नाही, त्याला तो समजलाच नाही! काय बनवलाय हा सिनेमा!! खर्रच्च!!

आज पाहू... उद्या पाहू... अस्सं करता करता जवळ जवळ महीना गेला आणि तो बघायचा राहूनच गेला.. आणि शेवटी आज मुहुर्त सापडला! खेदाची गोष्ट अशी की, आम्ही १४ जण मित्र-मैत्रीणी गेलो होतो आणि आमच्या सोबत अजून इतर दोघे जणच होते. म्हंजे एकंदरीत १६! अस्सो! मुद्दा तो नाहीये!!

सगळंच उत्कृष्ठ असलेला असा सिनेमा! कथा, अभिनय (सुली - मुक्ता बर्वे, तायप्पा - उपेन्द्र लिमये.. आणि बाकि सगळ्ळेच्च!!) दिग्दर्शन (राजीव पाटील), चित्रीकरण (संजय जाधव - १००/१०० मार्क्स) आणि संगीत (अजय-अतुल - देव माणसं)! सगळ्ळंच वाह!!

जीव गुंगला.. रंगला.. दंगला.. हे हरीहरण आणि श्रेया घोषाल यांनी गायलेलं गाणी अप्रतीम! त्याचं चित्रीकरण त्यापेक्षा भारी!!




अस्से मराठी चित्रपट खुप कमी येतात राव!! बघा बघा!! जिथे असेल तिथे आणि थिएटरमध्येच बघा! त्याशिवाय मज्ज्जा नाही! मला जाम उशीर झाला बघायला पण मी पाहीलाच!


वरच्या गाण्यावरून "हा सिनेमा कसा असेल!? विकृत असेल!" असा विचार न करता बघा! आणि नंतर बोला!

3 comments:

veerendra said...

he kahi tari veglach ahe !!
kharach pahila pahije asa chitrapat ahe ha !

Suhas Diwakar Zele said...

मी तरी हा फर्स्ट डाय फर्स्ट शो बघितला :)
अतिशय सुंदर अभिनय आणि कथा. अप्रतिम..एक्सेप्षनल

Anonymous said...

Lallati Bhandaar.........Are ved lagalay ya ganyani.