Thursday, August 20, 2009

कॅमेर्‍यातला गणेश-जन्म

लालबाग.. मुंबईचं लालबाग... मुंबईतले हजारो गणपती येथे जन्मला येतात. सगळ्या साईज मधले... ५ इंचापासून २५-३५ फूटापर्यंतचे. आमच्या घरच्या गणपतीचं जन्म्-स्थळ पण लालबागच. गणपती बनवताना बघायला, अनुभवायला जाम जाम बरं वाटतं. काय मेहनत घेतात ते कारागीर! रात्रं-दिवस राबतात! शिवाय काम म्हंजे डेड्-लाईन वरचं. मिस करून चालूच न शकणारं. कधी कधी रंगवलेल्या गणपतींपेक्षा न रंगवलेले गणपती ऑसम वाटत्तात. (त्यांचे फोटो पण चांगले येतात) अजून २ दिवसान्नी बाप्पा येतील. पण यांच काम चालुच आहे. जागेच्या अभावामूळे, हे एक्-एक गणपती (२०-२५ फूटाचे) २-३ दिवसात बनवला जातो आणि मंडळाला सांगून गणपती घरी पाठवला जातो. आणि त्याच जागेवर परत दुसरा गणपती जन्म घेतो. गणपती येण्याच्या साधारण २०-२५ दिवस आधीपासून हे चक्र चालु होतं. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही लालबागला जाऊन आलो आणि नेहमी प्रमाणे गणेश-जन्म कॅमेरात घेतला!


दरवर्षी बाप्पा येण्याआधी - आणि बाप्पा आल्यानंतर, लालबागला कमीत कमी ५-६ फेर्‍या होतातच! मुंबईतला खरा गणेशोत्सव तिकडेच असतो. धमाल रोषणाई अस्ते. २ दिवसान्नी बाप्पा येईल आणि परत एकदा फुल्ल्-ऑन धम्म्माल येईल!!

Wednesday, August 19, 2009

typo beehive!another typo experiment.. BEEHIVE FONT.. :D.... with flash offcourse.. n it's griddss!!!
again inspired by Anant Kulkarni