Friday, July 04, 2008

TARRR..

Mendak 001 : TARRRR....
Mendak 002 : TARRRR... TARRRRR....
Mendak 001 : TOPIC CHANGE MAT KARRRR....
-------------------------------------------------
courtesy : what the bloody fuck!

Sunday, June 29, 2008

इच्छा-आकांक्षा

'कर्णा, या जीवनात सार्‍या इच्छा-आकांक्षा यांचं हेच होतं. त्यांची स्वप्नं उराशी बाळगून असेच सुबक देव्हारे आपण मनात तयार करीत राहतो; पण त्या इच्छा-आकांक्षा साकार होतात, तेव्हा त्यांनी वेगळाच आकार धारण केलेला असतो. त्यांच्यासाठी मनात कोरलेले देव्हारे पार अपुरे ठरतात. त्या देव्हार्‍यांना शेवट अडगळीचंच स्वरूप येतं.'

कर्णाने कॄष्णाकडे पाहिले आणि तो म्हणाला,

'सत्य असलं, तरी पचवणं भारी कठीण जातं, अंधार पडू लागला. जाऊ आपण.'

- राधेय (रणजित देसाई)

Wednesday, June 04, 2008

sanga na ase ka?

Harshal :
Lok kojagiri pornima , mothya avajat tape lavun ani telkat khaun ani chandrakade na baghtach ka sajri kartat? mala padlelya prashna paiki ek baalbodh prashn. Sanga na ? sanga na ase ka? :)

Amit :
1) lok sajri karna mhanje pyayala basne, dj nachane, baayka aslyas garba khelane asa samjatat
2) kojagirila dodh pan pyayacha asta (pan tya peksha daroo jasta swasta ani effective aste), lok dj vajvoon nachatat (tyamule personality development hote bykan madye swatachi), ani chandra kade baghoon kay fayada - tya peksha garba khela ani pori patva, kuthalihi goshata asoode aplyala favourable karoon gya!! ashi lokanchi manovrooti zali manoon lok ashi vagtat. e.g. ganpati miravnokit dj thevane ani kata lagachya ganya var nachane

design dose!


Wednesday, May 21, 2008

एका झाडावर...

मास्तर : एका आंब्याच्या झाडावर १० पेरु आहेत
त्यापैकी ५ सफरचंद मी पाडले तर झाडावर आता किती चिकू रहातील?
पिंटू : ८ हत्ती
मास्तर : अगदी बरोबर! तू कसं ओळखलंस?
पिंटू : कारण आज माझ्या डब्यात कोबीची भाजी आहे!
-----------------------------------------------------
सौजन्य : हसा लेको, महाराष्ट्र टाईम्स.

Wednesday, May 14, 2008

चार दिवस गावचे!!






माझं गाव - मु. आदाड, ता. मुरुड (जंजिरा)

Thursday, May 01, 2008

artwork lifter - ZEE MARATHI / TALKIES




check out above video. It's about Maharashtra Din Greetings from Zee Marathi, Zee talkies Channel. At the end of this video, there is a shield design with sum design elements around. It is originally designed by me, 2 yrs. back for New Year, 2006. Zee Marathi n Zee Talkies has lifted it n used it directly without permission! They had used this design in 2006 for the same purpose. This is just re-release. How can one greet people with chori ka maal?? but they dared!!
below is the original artwork!


















महाराष्ट्र
दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!! जय महाराष्ट्र!!

Friday, April 18, 2008

आयुष्याचा अर्थ

कधी कधी वाटते की या आयुष्याला अर्थच नाही.

अर्थ शोधण्याचा आपण एकसारखा प्रयत्न करतो. आपल्या परीने अर्थ लावतो. आखाडे बांधतो. अनुभवावरुन काही अनुमाने काढतो. सिध्दातांच्या चौकटी स्वतःभोवती उभारतो. काय म्हणजे यश आणि काय म्हणजे अपयश, याचे आपल्या कल्पनेप्रमाणे हिशेब मांडतो. त्या हिशेबांच्या आधाराने यशस्वी होण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी रक्ताचे पाणी करुन धडपड करतो. एका मर्यादेत यशस्वी होतो. मग स्वतःला सांगतो की, मी बुवा असा. इतरांना पटवतो की, मी हा असा, माझी आई अशी, माझे वडील असे. हे आमचे खानदान. हे आमचे सत्त्व. हे आमचे तत्व. आम्ही म्हणजे असे वागणार. दुसरी दिशा आमची नाही. आम्ही असेच चालणार. प्राण गेला तरी बदलणार नाही. वगैरे वगैरे खूप. सारे अगदी खरेखुरे असते. निदान आपल्याला तरी ते तसे खरेखुरे वाटत असते. आपल्यापुरते ते अगदी कालत्रयी बदलणार नसते.

आणि एकदम काहीतरी घडते! वरवर पाहता अगदी क्षुल्लक वाटणारे. सहजपणे घडून जाणारे. आणि मग पाहावे तर ही क्षुल्लक गोष्टच सारे जीवन उद्ध्वस्त करुन टाकते. आपल्याला आजवर कळलेला आयुष्याचा अर्थ चुकीचाच होता, असे जाणवून देते. पण तोवर फार उशीर झालेला असतो. कुठे चुकले हे समजायच्या आतच सारे काही पार हाताबाहेर गेलेले असते. इतकी वर्षे एकाच दिशेने चालल्यामुळे दुसरी दिशा जणू समजत नाही. दुसरा अर्थ पटत नाही. नवीन कल्पनांच्या नव्या चौकटी पुन्हा उभारणे सोपे नसते. मग काय करावे ते समजत नाही. आपण नुसते हताश होतो. हतबल होतो. दिङमूढ होतो. आणि मनाची शांती कायमचीच गमावून बसतो.

- रत्नाकर मतकरी (गहिरे पाणी - वारस)

Monday, March 31, 2008

Saturday, March 29, 2008

trek RRKK

it's all about a Trek (21, 22, 23 March, 2008)
A trek with Trekshitiz.com
A trek of 4 forts
A trek of 3 days, 3 nights
A trek of 17 friends
A trek at Rohida, Raireshwar, KenjalGad, KamalGad!!
check out this clickings!!










































Wednesday, March 26, 2008

शिवाजी - आमचा brand ambassador

परवाच शिवजयंती साजरी झाली. आमच्या विभागात ठिकठिकाणी मस्तपैकी होर्डींग्ज पण लावले होते, अगदी एक आठवड्या आधीपासूनच! मस्त भपकेदार रंग! एखाद्या उत्तम आणि आकर्षक जाहिरातीचा नमुनाच!
त्यामध्ये विशेष गोष्ट हि होती की, होर्डींग्जवर शिवरायांच्या फोटो/चित्रा व्यतिरीक्त, काही समाजसेवकांच्या टोळीचे सूध्दा फोटो होते. एका होर्डींग्जमध्ये तर शिवरायांचा फोटो जर जरा लहान करून ठेवला असता तर, ते पण त्या समाजसेवकांपैकीच एक वाटले असते. सगळा प्रकारच अजब! नक्की हे होर्डींग्ज लावण्यामागचे कारण समजलंच नाही. म्हंजे खरंच शूभेच्छा, मानाचा मुजरा द्यायच्या आहेत की शिवरायांना आपला brand ambassador समजून मस्तपैकी जाहिरात करायचीये? शिवाय हे होर्डींग्ज आता दुसरा कोणता सण आल्याशिवाय उतरवणारच नाहीत!! या होर्डींग्ज टाईपच्या दिवाळी शूभेच्छा आम्ही २६ जानेवारीपर्यंत सोसत होतो.












त्याच दिवशी एक मिरवणूकही पाहीली. मिरवणूकीमध्ये अगदी पूढे ढोल्-ताशे, त्यानंतर ग्रुपमध्ये समाजसेवक, त्यांच्यामागे एक पालखी (त्यामध्ये नक्की काय होतं ते दिसलं नाही), नंतर शिवरायांच्या आणि दोन मावळ्यांच्या वेशातले घोडेस्वार (यांच्या आजु-बाजूला घोडे हाकलणार्‍या व्यतिरीक्त कोणीच नाही) आणि एकदम मागे एक रथरुपी मोटार. त्यामध्ये पूढे झाशीची राणी (का?) आणि मागच्या बाकावर बसलेल्या नऊवारी साडीतल्या ३-४ पोरी! सगळाच सावळा गोंधळ! कार्यक्रम कोणाचा? महत्त्व कोणाला? जाहीरात करण्यासाठी/ मिरवणुकीला निघण्यासाठी शिवजयंतीच्या दिवसाची वाटच बघत होते जणू!!

Monday, March 17, 2008

Web designed just for you

all web-designers, web-savvies.. must read!!
an article by Nash Paul
(Nash Paul - Creative Director, BCWEBWISE.com)

Tuesday, February 26, 2008

प्रिय मित्र आशुतोष,

तूझा नवा सिनेमा पाहिला! म्हंजे "जोधा अकबर". प्रदर्शित होण्यापुर्वीच एवढी हवा होती की तो बघण्यावाचून गत्यंतरच नव्हतं. खरंच भव्य सिनेमा बनवला आहेस. गाणी तर अप्रतीम, याचं सगळं श्रेय आपण रेहमान देवालाच द्यायला हवयं. दुसरा पर्यायच नाहीये!

असो! सिनेमा ठीक झालाय. मला जास्त आवडला नाही. अपेक्षापुर्ती झाली नाही. सिनेमामघ्ये फक्त भव्यपणा जाणवला, दिव्यपणा अजिबातच दिसला नाही. प्रसारमाध्यमांनी याचे एवढं का कौतुक केलं ते पण मला
कळलं नाही!

सिनेमा चालू होऊन एक तासाने मी शैलूला सांगितलं, "अरे! मजा येत नाहीये रे!"शैलू म्हणाला, " डॉक्युमेन्टरी बघतोय असं वाटतयं. एक खर्चिक डॉक्युमेन्टरी!" डॉक्युमेंटरी वरुन आठवलं, "वळु" पाहीलास? अरे! काय धमाल सिनेमा आहे रे! फुल्ल पैसा वस्सुल!! चित्रीकरण तर अप्रतिम!

सुडी पण वैतागला होता. खुप अनफीनिश्ड काम आहे म्हणाला! हत्तीसोबतच्या कुस्तीचे जाम कौतुक झाले होतं पण प्रत्यक्षात मात्र तो एक पोरखेळच वाटला मला! अकबर हत्तीवर स्वार होताच तो कसा त्याला काबु होतो हे एक अजब कोडंच आहे. या गज-अकबर युध्दासाठी बनवलेला सेट पण तेवढाच तकलादु वाटतो. गमंत म्हणजे हा हत्ती आक्रमक किंवा हिंसक वाटण्यापेक्षा मोनिषाला तो "क्युट" वाटला.

अकबराच्या भुमिकेसाठी ह्रतिक कितपत योग्य आहे, होता ते मला माहीत नाही. पण जोधाच्या भुमिकेसाठी ऍश्वर्या नक्कीच नाही. ती तलवार वगैरे चालवताना दाखवलीयं पण तिच्या मध्ये तो करारी पणा जाणवला नाही. तो मला धूम-२ मध्ये सुध्दा दिसला नव्हता. हि बाई फक्त दिसायला अतिसुंदर आहे एवढचं मी म्हणू शकेन.

सिनेमा मध्ये नितीन काकांनी पण खुपच भ्रमनिरस केला! त्यांचे सेटमध्ये प्लास्टर ऑफ पँरीस खुप वेळा दिसला. रंग कमी पडला की काय असं वाटायला लागलं होतं. अकबर स्वता:च्या भावाला जेव्हा ढकलून देण्याची शिक्षा देतो, त्यावेळेचा सेट म्हणजे अक्षरशः थुक लावण्याचा प्रकार वाटला. कड्यावरच्या फळ्या दिसतातच आणि पाठीमागचे पडदे म्हणजे मागचा कचरा झाकण्यासाठी लावलेले वाटतात. पण त्यांचं एकंदरीत काम अफलातूनच आहे यात वाद नाहिये.

कोणत्या तरी वर्तमानपत्रामध्ये आलं होतं की, "बघा आणि थक्क व्हा" मी बघून थक्क झालोच. का बघीतला याचं कारण मी शोधण्याचा प्रयत्न केल्यावर आढळलं की तुझ्यावरचा विश्वास! पण तो फोल ठरला! सिनेमा बघून काय आठवतयं असं कोणी विचारल्यावर मला फक्त ऍश्वर्याचे दागिने तेवढे आठवतात!!

असो. बाकी सिनेमा बराच (लांब आणि खर्चिक) होता.

घरी सगळे कसे आहेत? सगळ्यांना विचारलयं म्हणून सांग. निकूदादा कालच नेपाळ टूर करून आला. ती पण खर्चिक होती म्हणे.

तुझ्या पुढच्या सिनेमासाठी हार्दीक शुभेच्छा! तो सुध्दा किती ही बरा असला तरी पण मी तो थिएटरलाच पाहीन. तुझ्यावरचा विश्वास कायम आहे. तो तसाच राहु दे रे बाबा!!

चल मग परत लिहेन, तोपर्यंत नमस्कार!!!

- मंगेश

Monday, January 21, 2008

देवाचं घर!

"साला या दुनियेंत देव जर नसेल तर बेस्ट होईल बघ... उगाच साली देवळं नि मशिदी बांधायच्या नि खालीपिली खेपा मारत र्‍हायचं. त्या देवालाच घर नाय बांधून दिलं म्हंजे त्याच्या घरीं हेलपाटे मारायला नको; काय दादू?"

"तुझं कांयतरीच बोलणं सरजूदादा - "

"अरे कांयतरीच कसं? देवांना घरं मिळाली नाय म्हंजे त्यानाहि अशीच झोपडपट्टी उभी करावी लागेल! कसं... देवांची झोपडपट्टी - येशू ख्रिस्ताची झोपडी, महंमद पैगंबराची एक नि आपल्या शंकराची एक..." सरजूनें पायपाचा एक भलामोठा झुरका मारला नि त्याचा ठसका लागून तो मोठमोठ्यानें खोकूं लागला. स्वतःच्याच कल्पनेचं त्याला बेसुमार हसूं येत होतें -

- माहीमची खाडी - मधु मंगेश कर्णिक

Thursday, January 10, 2008

last year.. last trek...

last year.. on 30th n 31st Dec. at Anjneri, Tryambakeswar (Nasik)!!
this time i did toofaan colour editing with fotos clicked!! :D enjoyed it alot..!! Thanx alot Deepu!!