'कर्णा, या जीवनात सार्या इच्छा-आकांक्षा यांचं हेच होतं. त्यांची स्वप्नं उराशी बाळगून असेच सुबक देव्हारे आपण मनात तयार करीत राहतो; पण त्या इच्छा-आकांक्षा साकार होतात, तेव्हा त्यांनी वेगळाच आकार धारण केलेला असतो. त्यांच्यासाठी मनात कोरलेले देव्हारे पार अपुरे ठरतात. त्या देव्हार्यांना शेवट अडगळीचंच स्वरूप येतं.'
कर्णाने कॄष्णाकडे पाहिले आणि तो म्हणाला,
'सत्य असलं, तरी पचवणं भारी कठीण जातं, अंधार पडू लागला. जाऊ आपण.'
- राधेय (रणजित देसाई)
No comments:
Post a Comment