Monday, January 21, 2008

देवाचं घर!

"साला या दुनियेंत देव जर नसेल तर बेस्ट होईल बघ... उगाच साली देवळं नि मशिदी बांधायच्या नि खालीपिली खेपा मारत र्‍हायचं. त्या देवालाच घर नाय बांधून दिलं म्हंजे त्याच्या घरीं हेलपाटे मारायला नको; काय दादू?"

"तुझं कांयतरीच बोलणं सरजूदादा - "

"अरे कांयतरीच कसं? देवांना घरं मिळाली नाय म्हंजे त्यानाहि अशीच झोपडपट्टी उभी करावी लागेल! कसं... देवांची झोपडपट्टी - येशू ख्रिस्ताची झोपडी, महंमद पैगंबराची एक नि आपल्या शंकराची एक..." सरजूनें पायपाचा एक भलामोठा झुरका मारला नि त्याचा ठसका लागून तो मोठमोठ्यानें खोकूं लागला. स्वतःच्याच कल्पनेचं त्याला बेसुमार हसूं येत होतें -

- माहीमची खाडी - मधु मंगेश कर्णिक

1 comment:

Harshal said...

मस्त कादंबरी ! आमच्या बाल्पणी आमच्या बाल्मानावर या पुस्ताकाने बरेच ओर्खाडे उमटवले होते !!! दूसरी एक होती ती अरूण साधुंची "झीप्र्या"
कडक पुस्तक !!!