परवाच शिवजयंती साजरी झाली. आमच्या विभागात ठिकठिकाणी मस्तपैकी होर्डींग्ज पण लावले होते, अगदी एक आठवड्या आधीपासूनच! मस्त भपकेदार रंग! एखाद्या उत्तम आणि आकर्षक जाहिरातीचा नमुनाच!
त्यामध्ये विशेष गोष्ट हि होती की, होर्डींग्जवर शिवरायांच्या फोटो/चित्रा व्यतिरीक्त, काही समाजसेवकांच्या टोळीचे सूध्दा फोटो होते. एका होर्डींग्जमध्ये तर शिवरायांचा फोटो जर जरा लहान करून ठेवला असता तर, ते पण त्या समाजसेवकांपैकीच एक वाटले असते. सगळा प्रकारच अजब! नक्की हे होर्डींग्ज लावण्यामागचे कारण समजलंच नाही. म्हंजे खरंच शूभेच्छा, मानाचा मुजरा द्यायच्या आहेत की शिवरायांना आपला brand ambassador समजून मस्तपैकी जाहिरात करायचीये? शिवाय हे होर्डींग्ज आता दुसरा कोणता सण आल्याशिवाय उतरवणारच नाहीत!! या होर्डींग्ज टाईपच्या दिवाळी शूभेच्छा आम्ही २६ जानेवारीपर्यंत सोसत होतो.
त्याच दिवशी एक मिरवणूकही पाहीली. मिरवणूकीमध्ये अगदी पूढे ढोल्-ताशे, त्यानंतर ग्रुपमध्ये समाजसेवक, त्यांच्यामागे एक पालखी (त्यामध्ये नक्की काय होतं ते दिसलं नाही), नंतर शिवरायांच्या आणि दोन मावळ्यांच्या वेशातले घोडेस्वार (यांच्या आजु-बाजूला घोडे हाकलणार्या व्यतिरीक्त कोणीच नाही) आणि एकदम मागे एक रथरुपी मोटार. त्यामध्ये पूढे झाशीची राणी (का?) आणि मागच्या बाकावर बसलेल्या नऊवारी साडीतल्या ३-४ पोरी! सगळाच सावळा गोंधळ! कार्यक्रम कोणाचा? महत्त्व कोणाला? जाहीरात करण्यासाठी/ मिरवणुकीला निघण्यासाठी शिवजयंतीच्या दिवसाची वाटच बघत होते जणू!!
4 comments:
Could you please change colour and size of the Font. Difficult to read
1)विलेपार्ले (प.) येथे समर गीतांचा डीजे होता आणि पुढे मिरवणूक होती.
2)ज्या लोकांना सुट्या होत्या ते संध्याकाळी बसणार होते.
harekrishnaji, please check it now. i have changed the colour! :)
Shivaji Maharaj
http://ultimatespot.wordpress.com/2008/07/04/the-great-shivaji-maharaj/
Post a Comment