Friday, June 05, 2009

त्रिदल

ऑर्कट्वरच्या एका मित्रानं आशा बगेंचं "त्रिदल" वाच असं सुचवलं. आणि त्यानंतर बर्‍याच दिवसान्नी ते ग्रंथालयात सापडलं. अगदी पहील्या पानापासून ते शेवटच्या पानापर्यंत पुस्तक मस्तपैकी बांधून ठेवतं. साधारण ४-५ महीन्यांनंतर पुस्तक वाचलं हे... त्यामूळे मजा आली. बाकी आशाताईंनी अशा प्रकारे ते लिहीलयं की विचारुन सोय नाही. मस्तच लिहीलयं.

शारदा, श्रीनिवास आणि मंजू ही या कांदबरीतली प्रमुख पात्रं. पुस्तकाचं प्रत्येक पान शारदेनं व्यापलेलं आहे. शारदेचा स्वभाव जरा हेकेखोर, शांत आणि थोडा लहरी! हाच स्वभाव तिला स्वतःला जखडवून ठेवत असतो, तिला माहित असूनही! तिचा नवरा - श्रीनिवास, तिला शेवटपर्यंत साथ देतो, तिचा स्वभाव असा असूनही! मंजू - श्रीनिवासची बहीण आणि शारदेची कॉलेजपासूनची मैत्रीण, हिच्या मूळे शारदेचं पात्र जास्तीत जास्त वाचकापर्यंत पोचायला मदत होते. या तिघांविषयी जाम लिहावसं वाटतयं, पण मी का लिहू?? ते तुम्ही वाचा! (हाहा!!! मी शारदा झालोय का??)

माणसाचा स्वभाव कसा असतो आणि तो कालपरत्वे कसा बदलतो हे या कादंबरीत उत्तमरित्या आलयं.

अनायसे खुप काही शिकल्यासारखं वाटलं.

1 comment:

AASHISH said...

aasha tainchi hi ek katha jarur wach.. LAGN.. wed lagel wachlyawar.. khupach apratim.. WAATEWARACH GAAV naav aahe pustakacha..