अमित : आपलं आयुष्य उघड्या पुस्तकासारखं असावं!
मी : नाय रे! त्रास होतो!
अमित: अरे आपण ते कोणासमोर उघडं करतोय हे समजायला हवं!
मी : हम्म... पण आपलं पुस्तक वाचण्यात कधी कधी समोरच्याला इंटरेस्टच नसतो!
अमित : ती व्यक्ती रोज वाचनालयात जात असावी!
मी : हा! हा! हा!.. बरोबर आहे... असेल कदाचित.. त्यामुळे त्यांना आपल्या पुस्तकात इंटरेस्ट नाही!
अमित : त्यांचे वाचन भरपुर असल्यामुळे, आपल्या पुस्तकातले मथळे त्यांना उथळ वाटतात!
मी : त्यांच्यासाठी आपलं पुस्तक म्हंजे, चंपक मासिक!
अमित : हम्म... समोर संभाजी सारखा ग्रंथ असताना, चंपक कोण वाचेल?
मी : काहींना तर संभाजी वाचायलाही वेळ नाहीये!! ;)
2 comments:
अरे तो क्सा वाच्णार, संभाजी तर माज्याकडे आहे आणी माझा संभाजी सैद क्डे आहे.
त्याच्याकडे जरी पुस्तक असते तरी त्याचा काहीच उपयोग झाला नसता! आणि इतिहास घडवणारे इतिहास का वाचतील?
Post a Comment