अमित : आपलं आयुष्य उघड्या पुस्तकासारखं असावं!
मी : नाय रे! त्रास होतो!
अमित: अरे आपण ते कोणासमोर उघडं करतोय हे समजायला हवं!
मी : हम्म... पण आपलं पुस्तक वाचण्यात कधी कधी समोरच्याला इंटरेस्टच नसतो!
अमित : ती व्यक्ती रोज वाचनालयात जात असावी!
मी : हा! हा! हा!.. बरोबर आहे... असेल कदाचित.. त्यामुळे त्यांना आपल्या पुस्तकात इंटरेस्ट नाही!
अमित : त्यांचे वाचन भरपुर असल्यामुळे, आपल्या पुस्तकातले मथळे त्यांना उथळ वाटतात!
मी : त्यांच्यासाठी आपलं पुस्तक म्हंजे, चंपक मासिक!
अमित : हम्म... समोर संभाजी सारखा ग्रंथ असताना, चंपक कोण वाचेल?
मी : काहींना तर संभाजी वाचायलाही वेळ नाहीये!! ;)