नटरंग येण्याच्या आधीच त्याच्या गाण्यांनी भुरळ घातली. गाणी कानात येऊन आता जवळ जवळ दिड महिना झालायं, पण असा एकही दिवस गेला नसेल की, ज्या दिवशी आम्ही ही गाणी कमीत कमी १५-२० वेळा ऐकली नसतील. आणि मग अशी गाणी मला काहीतरी करायला प्रवॄत्त करु लागली आणि मग हे झालं. हि नटरंगची झिंगच आहे म्हणा ना!!