हा ले़ख अख्ख्या महाराष्ट्राचे भावोजी "आदेश बांदेकर" यांच्या नावावर!!
धमालच आहे! मला यांचे बोलणं जाम आवडतं!! "एकापेक्षा एक" मध्ये तर ह्यांचा "पपॉमन्स्" रॉकींग असतो! हो!! खरंच! त्यांना "परफॉर्मन्स्" हा शब्दच बोलता येत नाही. हवं तर "एकापेक्षा एक" बघा एकदा खास यासाठी! उगाचच आपण जास्त फेंडली (फ्रेंडली) आहोत, असा आव आणून सर्व स्पर्धकांशी बोलणार! त्यात खवचटपणा किती असतो, ते चाणाक्ष प्रेक्षकांना सांगायला नको! अगदी म्हागुरुंना सुध्दा!!
बायका जरा खाष्टच असतात असं ऍकून आहे! पण त्या सूध्दा यांना प्रत्युत्तर का देत नाहीत ते कळत नाही! मात्र "एकापेक्षा एक" च्या सेलिब्रीटी भागामध्ये अमॄता खानविलकरने एकदा चमत्कारच केला होता! हिचा "पपॉमन्स्" झाल्यावर यांनी तिला काहितरी विचारलं आणि त्याला उत्तर देण्याऐवजी ती चक्क त्यांना म्हणाली, "ते राहु द्या हो! आधी ज्युरींचं मत ऍकू या!" ते ही अगदी हात झिडकारुन! मला जाम मजा आली ते पहायला! म्हंजे कोणीतरी सापडला होता! :)
"पपॉमन्स्" झाल्यावर, उगाचच एखादा बिनडोक प्रश्न! "कसं झालं?", "का झालं?", "१००% दिलं असं वाटतयं का?" इ. उत्तरं तर यांना स्वतःलाही माहीत नसतात आणि कधी कधी तर समोरचा काय बोलतोय, याकडे दुर्लक्ष देऊन सरळ ज्युरींचं मत! ज्युरी आणि म्हागुरुंचं वक्तव्य चालु असताना यांचा चेहरा पहावा... नेहमी बारा वाजलेले!!!
एकदा पाहूणी कलाकार म्हणून कोणीतरी लहान मुलगी आली होती, तिचा "पपॉमन्स्" झाल्यावर, हे आले आणि यांनी तिला उचलून घेतलं आणि नेहमीप्रमाणे काहीतरी खवचट प्रश्न टाकला आणि त्यानंतर त्यांना कळलं की, अरे! हीला जास्त वेळ उचलून घेऊ शकत नाही आणि तसं केलं तर मग माईक कोण पकडणार? मग त्यांनी तिला उतरवलं आणि मग ते बसुन बोलले! त्यात ही नेहमी प्रमाणे, त्यांनी तिला उगाचच इकडचे-तिकडचे प्रश्न विचारले आणि नंतर काहि न सुचल्यावर, माझ्या आई मला माफ कर! असं बोलून थांबले!
अजून एक, कोणाला ही "पपॉमन्स्" साठी बोलवल्यावर, एक टुणकन् बेडूक उडी मारतात ते! म्हंजे या वाक्यानंतर, "आणि आता आप्ल्यासमोर येत आहे.. अमूक गावची तमूक" आणि लगेच छोटीशी बेडूक उडी मारुन स्क्रीनबाहेर!
असो! बांदेकरांविषयी कोण कधी लिहील का ते माहीत नाहि! विचार केला की आपणच सुरुवात करावी! :)
भावोजी रॉक्स! "टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचं स्वागत करु या!"
ता. क. : मला हा ले़ख फक्त बांदेकरांचा "पपॉमन्स्" ह्या शब्दोच्चारामुळे लिहावसा वाटला. "किंबहुना" त्या शब्दोच्चारानेच भाग पाडलं म्हणू या!
अजून एक ता. क. : हा ले़ख काही कारणास्तव मी पूर्ण टाकला नव्हता. पण कालचा / आजचा त्यांचा "पपॉमन्स्" पाहुन तिडीक गेली, डोक्यात आणि परत ही पोस्त टाकली!! भावोजी माफ करा! पण जे आहे ते आहे आणि ते तुम्ही स्वतः सुध्दा नाकारु शकत नाही!